गावा विषयी माहिती

अहमदनगर जिल्हायाच्या पश्चिमेकडील अकोले तालुक्यात धामणगाव पाट हे एक गाव आहे.सह्यादरी पर्वतातील कळसुबाई महाराष्ट्रांतील सर्वात उंच पर्वताच्या शिखराच्या पूर्वेला हरीशचन्द्र गडाच्या डोगर रांगामद्ये समुद्रसपाटी पासून ७४० मीटर उंचीवर वसलेल्या या गावाचे स्थान १९ अंश २७ उत्तर अक्षांश ७३ अंश ५७ पूर्व रेखंशावर आहे.तालुक्याच्या ठीकानापासून इतके आहे.गावाच्या उत्तरेला अंतर्वक्र डोंगर रांगेत अनुक्रमे १)लागण्या,२)खरडया,३)वानदेव,४)रोटम्या,५)आढवला,६)परटया व ७)खडकमाळी हे डोंगर आहेत. धामणगाव पाट या गावाच्या पंचकृषित मोग्रस,पाडाळने,आभोल कोतूळ,शेलद.धामणगाव आवारी ई. गावे आहेत.या सर्व गावांच्या प्रापंचिक गरजा भागवन्यासाटी कोतूळ हीच बाजार पेट आहे.धामणगाव पाट हे गाव अकोले कोतूळ व राजूर-कोतूळ महामार्गवर आहे. कोलार घोटी या राज्य महामार्ग क्रमांक ४४ वर असलेल्या अकोले येथून वाशेरे घाट मार्गे पिंपळगाव खाड,पांगरी व मोग्रस या गावावरून तसेच अकोल्यावरून धामणगाव आवारी -चिंचखंड मार्गे रोटम्या व आढवळा या डोंगरामधून धामणगाव पाट या मार्गी जातो.अकोले मार्गे ३५ किलोमिटर अंतरावर असलेले संगमनेर हे धामणगाव ला सर्वात जवळचे शहर आहे.

धामणगांव पाट बद्दल आणखी काही .....


जनगणना 2011 च्या माहितीनुसार धामणगांव पाट गावचे स्थानक कोड किंवा गाव कोड 55725 9 आहे. धामणगांव पाट गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यामध्ये स्थित आहे. हे उपजिल्हा मुख्यालय अकोला पासून 15 किमी आणि जिल्हा मुख्यालय अहमदनगर पासून 135 किमी दूर स्थित आहे. 200 9च्या आकडेवारीनुसार, धामणगांव पाट हे धामणगांव पाट गावचे ग्रामपंचायत आहे.गावचे एकूण भौगोलिक क्षेत्र 1440 हेक्टर आहे. धामणगांव पाटची लोकसंख्या 2,868 आहे. धामणगांव पाट गावात 588 घरे आहेत. संगमनेर हे जवळील सर्वात जवळचे शहर आहे जे ३५ किमी दूर आहे.

धामणगांव पाट गाव ची लोकसंख्या


[table id=6 /]

धामणगांव पाट गावशी दळणवळण


[table id=7 /]

धामणगांव पाटजवळील गावे