सहकारी सोसायटी

sosayati

ग्रामीण पातळीवर शेतकऱ्यांची कामधेनु म्हणून विविध कार्यकारी अधिवासी विकास सोसायटीकडे पाहिले जाते .गावातील सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्प व्याजदरांमध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

त्यामुळे गावातील सोसायटी हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय बनलेला आहे. सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या या सोसायटीमधून सर्वांनाच गरजेनुसार पतपुरवठा केला जातो.त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती होण्यास मदत झाली आहे.हनुमान मंदिराच्या शेजारी सोसायटीचे सुसज्ज ऑफिस आहे.यातूनच सर्व कारभार चालतो.त्याचबरोबर सोसायटीच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानही चालवले जाते;ज्याच्यामधून अल्प दरामध्ये रेशन कार्डधारकांना गहू व तांदूळ याचा पुरवठा केला जातो.