गावातील दवाखाने

सरकारी दवाखाना

       सरकारी दवाखाना असल्यामुळे गावात सुलभ आणि सोयीचे उपचार करण्यात येतात.  गावात दवाखाना असणे खूप गरजेचे असते.यामुळे नागरिकांना बाहेर शहराच्या ठिकाणी जावे लागत नाही .

        सरकारी बरोबरच गावामध्ये खाजगी दवाखाने ही आहेत.त्यात सत्यवान शेळके यांचा दवाखाना अग्रगण्य आहे.त्यानंतर देशमुख डॉक्टर यांचाही दवाखाना आहे. अशा प्रकारच्या दवाखान्यांमुळे गावातील व शेजारील गावातील लोकांचीही दवा  पाण्याची सोय होते आहे.आरोग्य सुविधा ही आपल्या दृष्टीने एक अत्यावश्यक सेवा आहे. म्हणूनच गावांमध्ये शासनाचे ग्रामीण उपकेंद्र आहे. त्यामध्ये नवजात शिशूंना लसीकरण केले जाते. गरोदर स्त्रियांसाठी औषधोपचार केले जातात,त्यांची विशेष काळजी घेतली जाते. त्याचबरोबर छोट्या-मोठ्या आजारांवर उपचारही केले जातात. साथीचे आजार पसरू नयेत म्हणून लोकांमध्ये जनजागृती केली जाते. या ठिकाणी कुशल व प्रशिक्षित डॉक्टरांचा स्टाफ सदैव तैनात असतो. डॉक्टरांच्या मदतीला एक “आशा” मदतनीस आहे.

हे उपकेंद्र उपचारांसाठी चोवीस तास उपलब्ध असते. यामुळे गावातील नागरिकांना अत्यावश्यक वेळेस तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होते. त्याचबरोबर गावात इतर दोन खाजगी दवाखाने आहेत.