बातम्या आणि कार्यक्रम

भारतीय संस्कृती मधील जवळपास सर्वच सण उत्सव गावांमध्ये मोठ्या आनंदाने साजरे केले जातात . सर्व गावकरी यामध्ये मोठ्या उत्साहात सहभाग घेत असतात. प्रामुख्याने शेती हाच गावातील मुख्य व्यवसाय असल्यामुळे श्रावणी अमावस्या ला येणारा बैलपोळा गावात अगदी थाटामाटात आणि जोशात साजरा केला जातो सर्व गावकऱ्यांच्या आनंदाला या दिवशी उधाण आलेलं असतं. बैलांना अंघोळ घालून,त्यांच्या शिंगांना बेगड लावून,झुली चढवून मोठ्या हौसेने सजवले जाते. बँडच्या तालावर जंगी मिरवणूक काढली जाते.गुलाल उधळला जातो. सर्व गावकरी अगदी बेभान होऊन बैलपोळा उत्साहात साजरा करतात. सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये बैलांची संख्या तशी दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. आणि त्यांची जागा ट्रॅक्टर सारख्या यंत्राने घेतली आहे मात्र आपल्या काळ्याआईच्या प्रती कृतज्ञता म्हणून ट्रॅक्टरचे सुद्धा मिरवणूक काढणे चालू केलेले आहे. गावाच्या बैलपोळ्याचे विशेष म्हणजे पंचक्रोशीतील अनेक गावांतून धामणगावचा बैलपोळा पाहण्यासाठी नागरिक हजर असतात. बैलपोळा जर पूर्वा नक्षत्रांमध्ये आला तर पुरणपोळ्या सोबतच पुऱ्या करण्याची प्रथा माझ्या गावामध्ये आहे. आणि ती अगदी फार पूर्वीपासून अजूनही तशीच चालू आहे.
सांस्कृतिक, आध्यात्मिक अथवा धार्मिक कारणांनी साजर्‍या होणार्‍या दिवसांना सण असे म्हणतात. गावातील महत्त्वाच्या सणांच्या दिवशी शाळा, कॉलेजे, संस्था आणि सरकारी व गैरसरकारी कार्यालये यांना सुटी जाहिर केलेली असते. यातीलच एक महत्त्‍वाचा सण म्‍हणजे बैलपोळा किंवा बेंदूर. शेतात ... बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस महाराष्‍ट्रीयन उत्‍सवच जणू. कृषीप्रधान व्यवस्‍थेमुळे या सणाला महाराष्‍ट्रात विशेष महत्त्व आहे. भारतातील बरेचसे सण, उत्सव मेळे आणि जत्रा या मौसमी स्वरूपाच्या असतात.त्या साजरा करण्याचा दिनांक भारतीय पंचांगाला अनुसरून असतो. या सणांचे अंकनही मराठी कॅलेंडरवर असते.