गावाचा इतिहास

पूर्वी गावच्या परिसरात धामण या नावाचे वृक्ष मुबलक प्रमाणात असल्यने धामणगाव असे नाव पडले.धामण या वृक्षाला चैत्र महिन्यत पालवी फुटलेली असते.या काळात गावात चारा उपलब्ध नसतो.अश्या परीस्तीतीत शेळ्यांना चारा देणारा,औषधी गुणधर्म असेलेला ,शेतीच्या कामाला उपयुंक्त लाकूड पुरवणारा हा वृक्ष महत्वपूर्ण ठरतो.पर्यावर्णाचा समतोल बिगडल्याने सद्या वृक्षांची संख्या घटली आहे.गावच्या ईशान्य असलेल्या डोंगरावरून पाऊसाळ्यात वाहणारे पाणी अनेक नाले व ओढे यांच्या स्वरुपात मुळा नदीला जाऊन मिळते.पूर्वी ह्या ओढ्यनवर मातीचे बांध घालून,पाट काढून त्या पाटानच्या मदतीने गावच्या शेतीला पाणीपुरवटा केला जाई या पाटांची संख्या सुमारे ५० इतकी होती.पाटाच्या मदतीने पाणीपुरवटा करण्याच्या वैशीस्टायपूर्ण पद्धतीमुळे या गावाला धामणगाव पाट असे म्हणतात, विहिरींची संख्या वाढल्याने सद्या पाटांचा वापर कमी होतो..

रचना :

गावाच्या ईशान्य- वायव्य दिशेने सात डोंगरे आहेत. गावाच्या पश्चिमेला बारव आहेत. गावाला गावकूस आहे. गावाबाहेर पूर्वेला गावाची वेस आहे. तेथे रघुदास बाबांची समाधी आहे. गावाचा परिसर खूप मोठा आहे. गावातील मुख्य गावठानाशिवाय ठाकरवाडी,मालुंजकर,घुलेवाडी,गारवाडी,शेळकेवाडीस,माळवाडी व कुंभारदरा या सात वाड्या आहेत. या वाड्यामधे एकापेक्षा अधिक जातीतीत वस्ती सहसा दिसत नाही. या सात वाड्या, त्यात राहणाऱ्या प्रमुख आप्तगटांच्या नावाने अथवा जातीच्या नावाने ओळखल्या जातात. आर्थिक, सामाजिक व राजकीय दृष्ट्या या वाड्या गाव पांढरिवर (गावाची मुख्य वसाहत,सदर बरड जमिनीचा रंग पांढरा असल्याने पांढरी म्हणतात) अवलंबून आहेत.वाडयांचे स्वतःचे असे सामाजिक व्यक्तिमत्व आहे. तरीही त्या गावाच्या अविभाज्य घटक आहे. गावाच्या पश्चिम बाजूस भोर आणि चौधरी या कुटुंबीयाकडे पांढरीची इनाम जमीन आहे.