जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

zp0

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेची स्थापना १९५१ या साली झाली. त्या काळात परिसरात एक मोठी शाळा म्हणून इ.१ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग होते.नजीकच्या परिसरात शाळा उपलब्ध नसल्याने मुले येथे शिक्षण घेत असे.प्रारंभी अनेक शिक्षक शाळेत राहून रात्राभ्यासिका चालवत,निरंतर शिक्षण,साक्षरता अभियानाचे कार्य करत.आज शाळेत 1 ली ते 4 वी पर्यंतचे वर्ग असून शाळेत गुणवत्ते बरोबर,सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम शिक्षक व पालक राबवत आहेत.शाळेत आज अत्यावश्यक व आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी ग्रामस्थ पुढे येउन सहकार्य करत आहेत.नुकताच शाळेने ISO मानांकन प्राप्त केले आहे.

तसेच गावामध्ये आणि गावामध्ये असणाऱ्या वाड्या वस्त्यावर वरही शाळा आहेत . त्यात मालुंजकर वाडी , शेळके वाडी , ठाकरवाडी ,गारादेवी वाडी आणि घुले वाडी येथे पहिली ते चौथी पर्यंत शाळा आहे.